पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोर्ट अन् निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नाही : राज ठाकरे

राज ठाकरे यांनी घेतली ममता बॅनर्जी यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकातामधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात या दोन्ही नेत्यांनी जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा केली. देशातील विविध राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम संदर्भात ठाम भूमिका घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरेंनी मोजक्या शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ईव्हीएमच्या मुद्यावर कोर्ट किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले.      

राज ठाकरे हे प्रसिद्धीसाठी स्टंट करणारे नेतेः प्रकाश आंबेडकर

बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होणे गरजेचे आहे. जपान, अमेरिका या जगातील शक्तिशाली राष्ट्रांची उदाहरणे देत त्यांनी ईव्हीएमसंदर्भातील आपला विरोध दर्शवला. निकालापूर्वीच किती जागांवर विजयी होणार हे कसे समजू शकते? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. 

 

'राज ठाकरेंच्या मोदीविरोधी भूमिकेचा आम्हाला उपयोग झालाय'

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधी प्रचार करणाऱ्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंबंधी त्यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयोगाची भेट देखील घेतली. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर राज ठाकरे यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केले आहे. यापूर्वी त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly elections 2019 mns chief raj thackeray meet mamata banerjee On evm issue