पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूकः भाजपा-शिवसेना समान जागा लढणार

उद्धव ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. याबाबत औपचारिक घोषणा होणेच बाकी आहे. दोन्ही पक्षांनी समसमान जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचप्रकारे सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हे अडीच-अडीच वर्षे मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी याला दुजोरा देत म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकांवरुन दोन्हा पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. दोन्ही पक्षांमध्ये सत्तेत समान हिस्सेदारीनुसार एकत्र निवडणूक लढवण्यावर सहमती बनली आहे. त्यानुसार राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघापैकी दोन्ही पक्ष निम्या-निम्या जागेवर लढतील. त्याचप्रकारे दोन्ही पक्षाचे मुख्यमंत्री निम्या-निम्या काळासाठी होऊ शकतात. त्याचबरोबर छोट्या सहकारी पक्षांना भाजप किंवा शिवसेनेला आपापल्या हिस्स्यातील जागा द्याव्या लागतील.

आमचं ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?: उद्धव ठाकरे

लोकसभेतील स्थिती

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ आणि शिवसेनेने २३ जागा लढवत मोठा विजय मिळवला होता. मागील लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी युती केली होती. मात्र, मागील विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवली होती. निवडणुकीनंतर एकत्र येत त्यांनी सरकार स्थापन केले होते. पण यावेळी दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेसाठी सहमती दर्शवली होती.

काँग्रेसची स्थिती दयनीय

संजय राऊत यांनी 'हिंदुस्थान'शी बोलताना म्हटले की, दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा होत आहे. दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुकीची तयारी करत आहेत. राज्यात यावेळी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती दयनीय आहे. याचा फायदा युतीला होईल. केंद्रात आणखी मंत्रिपदाची संधी मिळण्याबाबत ते म्हणाले की, शिवसेनेचा फोकस राज्यातील राजकारणावर आहे. केंद्रात आमची भूमिका मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(स्त्रोत-लाइव्ह हिंदुस्थान)