पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'महा' चक्रीवादळाचा धोका; गुजरातमध्ये अलर्ट जारी

महा चक्रीवादळ

अरबी समुद्रात निर्माण झालेले 'महा' नावाचे चक्रीवादळ बुधवारी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. महा चक्रीवादळाचा धोका पाहता गुजरातमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. महा चक्रीवादळ ९० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ दुपारपर्यंत गुजरातच्या दीव समुद्रकिनाऱ्यावर धडकू शकते.

भाजप-सेनेतील तिढ्याने संसद अधिवेशनाचा कार्यक्रम अनिश्चित

महा चक्रीवादळाचा धोका पाहता गुजरातमध्ये एनडीआरएफच्या सहा टीम मंगळवारी रात्रीच दाखल झाल्या आहेत. गुजरातच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात या टीमला रवाना करण्यात आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार आणि गुरुवारी गुरजारमधील सुरतसह १२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याठिकाणी ९० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. 

'युतीला बहुमत असल्याने भाजप-सेनेनेच सत्ता स्थापन करावी'

हवामान विभागाच्या माहितीनुसार, महा चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेची सर्व व्यवस्था केली आहे. महा चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसंच, कोणिही समुद्राच्या दिशेने जाऊ नये याची काळजी घ्यावी असे देखील सांगण्यात आले आहे. तसंच या चक्रीवादळामुळे उत्तर कोकण आणि गुजरातमध्ये वादळीवाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

इन्फोसिस कंपनी १० टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ