पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मदरशांमधून गोडसे, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक बाहेर पडत नाही - आझम खान

आझम खान

मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक बाहेर पडत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा हिंदूत्त्ववादी संघटना आणि समाजवादी पक्षामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे.

देशातील मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आझम खान म्हणाले, मदरशांमधून शिकून नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या सारखे लोक बाहेर पडत नाहीत. याकडे सरकारने आधी लक्ष द्यायला हवे. जे नथुराम गोडसे याच्या विचारांचे उदात्तीकरण करीत आहेत, ते लोकशाहीचे शत्रू आहेत. ज्यांना दहशतवादी कारवायांमध्ये आरोपी केले आहे, त्यांना कधी कोणते बक्षिस दिले जात नाही. 

OBC च्या २७ टक्के आरक्षणाची ३ उपगटांत विभागणी होण्याची शक्यता

आझम खान यांनी आपल्या वक्तव्यातून प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. मालेगाव स्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून उमेदवारी दिली आणि त्या तेथून निवडून आल्या आहेत. 

केंद्र सरकारला जर मदरशांना मदत करायची असेल, तर त्यांनी त्यांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्यावे, असे आझम खान यांनी म्हटले आहे. मदरशांमधून धार्मिक शिक्षण दिले जाते. पण त्याचसोबत इंग्रजी, हिंदी आणि गणिताचेही अध्यापन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. आता जर सरकारला काही बदलायचेच असेल, तर मदरशांचा दर्जा वाढवा. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, माधान्ह भोजन तिथे सुरू करा, असे ते म्हणाले. 

भेरी भेल डन !, लंडनमधल्या परदेशी भेळवाल्याचं बिग बींकडून कौतुक

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आझम खान समाजवादी पक्षाकडून रामपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत.