पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ सरकारच्या बहुमत चाचणीसंदर्भात संभ्रम!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

काँग्रेसचा हुकमी एक्का असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार धोक्यात आल्याची चर्चा सुरु आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला अलविदा केल्यानंतर अनेक आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे  सोमवारी मध्य प्रदेश विधानसभेत बहुमताचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र रविवारी जारी करण्यात आलेल्या विधानसभेच्या सत्रातील कार्यसूचीमध्ये बहुमत चाचणीचा उल्लेख दिसत नाही. 

सार्कच्या खास बैठकीत पाकने उपस्थित केला जम्मू-काश्मीरचा मुद्दा

मध्य प्रेदश विधानसभेच्या सोमवारच्या कार्यसूचीमध्ये राज्यपाल लालजी टंडन यांच्या अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत कमलनाथ सरकार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. १६ मार्चपासून मध्य प्रदेश विधानसभेच्या सत्राला सुरुवात होत आहे. दरम्यान भाजपकडून सर्व आमदारांना संसदेत उपस्थित राहण्यासंदर्भात तसेच विश्वास दर्शक ठरावावेळी पक्षाच्या बाजूने मतदान करण्याबाबत व्हिप जारी करण्यात आला आहे.  

जपानहून परतलेला पिंपरी-चिंचवडचा आणखी एक जण कोरोनाच्या जाळ्यात

भाजपचे विधीमंडळ नेते नरोत्तम मिश्रा यांनी पक्षाच्या आमदारांसाठी रविवारी व्हिप जारी केला आहे. १६ मार्च पासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सत्रामध्ये उपस्थितीत राहणे अनिवार्य असून विश्वास दर्शक ठरावावेळी पक्षाच्या बाजूने मतदान करावे, यासंदर्भात व्हिप जारी करण्यात आला आहे.  मध्य प्रदेशमध्ये सध्या सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर भाजपने आपल्या सर्व आमदारांना हरियाणातील गुरग्राममधील एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहे.  राज्यपाल लालजी टंडन यांनी शनिवारी रात्री उशीराने मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहिले होते. अभिभाषणानंतर विधानपरिषदेत बहुमत सिद्ध करा, असे आदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. मात्र कार्यक्रम पत्रिकेत याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Madhya Pradesh kamal Nath Govt floor test in Suspence as It does not mention in business of the State Assembly for tomorrow