पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणता सर्जिकल स्ट्राईक केला?, कमलनाथांचा भाजपला सवाल

मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला असे ते म्हणतात. पण सर्जिकल स्ट्राइक केव्हा आणि कुठे केला?, असा सवाल कमलनाथ यांनी मोदी सरकारला विचारला आहे. तसंच, सर्जिकल स्ट्राईकबद्दल सविस्तर सांगा, असे त्यांनी सांगितले आहे.

राजस्थानात दलितांवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ भीषण - राहुल गांधी

भोपालमध्ये एका सभे दरम्यान कमलनाथ यांनी सांगितले की, 'इंदिरा गांधी सरकार असताना ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. मात्र हे आता म्हणतात आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. कोणता सर्जिकल स्टाईक केला? हे सविस्तर सांगावे. तसंच, आज हे राष्ट्रवादाबद्दल बोलत आहेत. आता कोणता राष्ट्रवादाचा धडा शिकवणार आहात? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 

७० लाख नाही तर फक्त १ लाख लोकच करणार डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत

कमलनाथ यांनी पुढे असे सांगितले की, 'मध्य प्रदेश सरकार राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) लागू करणार नाही. तसंच, एनपीआरच्या ज्या अधिसूचनेबद्दल बोलले जात आहे ते ९ डिसेंबर २०१९ चे आहे. या अधिसूचनेनंतर केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला. म्हणजेच, जो एनपीआर अधिसूचित केला गेला तो सीएए २०१९ अंतर्गत केला गेला नाही.', असे त्यांनी सांगितले. 

VIDEO:...तर चामडी सोलून काढू, काँग्रेस आमदाराची भाजपला धमकी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:madhya pradesh cm kamal nath raised questions on surgical strike asked when and where it happened