पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लतादीदींचा उपचारांना सकारात्मक प्रतिसाद, मधुर भंडारकर यांची माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर

गानसम्राज्ञी या लता मंगेशकर या गेल्या  आठवड्याभराहूनही अधिक काळ रुग्णालयात आहेत. त्यांची  प्रकृती आता स्थिर असून त्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती दिग्दर्शक मधुर भंडारकर  यांनी दिली आहे. 

या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळतो ब्रेक

मधुर भंडारकर यांनी नुकतीच मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन लतादीदींची भेट घेतली. ११ नोव्हेंबरला श्वसनाचा त्रास होत असल्यानं लतादीदींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदींची प्रकृती सुधारावी यासाठी देशभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते प्रार्थना करत आहेत. 

 मधुर भंडारकर यांनी इन्स्टाग्रामवर लतादीदींचा फोटो शेअर केला आहे. ' लता मंगेशकर यांची भेट घेतली सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून त्या  उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद' अशी पोस्ट मधुर भंडारकर यांनी लिहिली आहे. 

... म्हणून SPG सुरक्षेच्या मुद्द्यावर शहांऐवजी नड्डा यांनी उत्तर दिले

यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन लतादीदींची भेट घेतली होती.