पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नीरव मोदीच्या संपत्तीचा होणार लिलाव; या महागड्या वस्तूंचा समावेश

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये महागडे घड्याळ, हॅण्डबॅग, कार आणि पेंटिंगचा समावेश आहे. या वस्तूंचा लिलाव दोन टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. लिलावासाठी मुंबईच्या एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. जी कंपनी ईडीच्या माध्यमातून लिलावाचे आयोजन करणार आहे. पहिला लिलाव २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. तर दुसरा लिलाव ३ आणि ४ मार्च रोजी ऑनलाईन केला जाणार आहे. 

'वाडिया रुग्णालयाचा निधी मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे'

लिलाव करण्यात येणाऱ्या नीरव मोदीच्या संपत्तीमध्ये महागड्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये एम एफ हुसैन यांचे महाभारत सिरीजचे पेंटिंग ज्यांची अंदाजे किंमत १२ ते १८ कोटी ऐवढी असल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त १९७२ मधील व्ही एस गायतोंडे यांच्या पेंटिंगचा देखील समावेश आहे. पेंटिंग व्यतिरिक्त जेगर लेकॉत्रेचे लिमिटेड एडिशन आणि गेरार्ड पेरेगॉक्सच्या घड्याळाचा समावेश आहे. या लिलावात ८० महागड्या ब्रँडेड हॅण्डबॅग्सचा देखील समावेश आहे. 

हवी तेवढी निदर्शने करा, CAA मागे घेणार नाही - अमित शहा

नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करणारी कंपनी सैफ्रॉन आर्टच्या संस्थापकने सांगितले आहे की, 'आम्ही ईडीसाठी यापूर्वी देखील लिलाव केला आहे. या लिलावामध्ये जगातील काही प्रमुख कल्ट ब्रांड्सच्या वस्तू आहेत. या वस्तूंची मागणी जास्त करुन सेलिब्रिटी आणि महागड्या वस्तूंना घरामध्ये ठेवणारे लोकं करतात. लिलाव करण्यात येणाऱ्या वस्तूंना ओबेरॉय हॉटेलच्या गॅलरीमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. 

Video :धडपडत धाव पूर्ण केली, पण रिटायर हर्ट होऊन रुग्णालयात