पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकचे जहाल सैन्य अधिकारी फैज अहमद आयएसआयचे प्रमुख

लेफ्टनंट जनरल फैज हमीद (Photo: Twitter @nadeemmalik)

पाकिस्तानने त्यांची गुप्तचर संस्था आयएसआयच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांची नियुक्ती केली आहे. लेफ्टनंट जनरल आसिम मुनीर यांच्या जागी त्यांची नेमणूक केली आहे. जहाल समजले जाणारे जनरल फैज हमीद यांची नियुक्ती सर्वांनाच आश्चर्याचा धक्का आहे. आसिम मुनीर यांनी ८ महिन्यांपूर्वीच पदभार घेतला होता. सर्वसाधारणपणे आयएसआय प्रमुखाचा कार्यकाळ ३ वर्षे असतो.

भारताचा पाकवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राइकः अमित शहा

यापूर्वीही आयएसआयमध्ये काम केलेले फैज हमीद यांना डायरेक्टर जनरलपदी नेमण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यम विभागाने त्यांच्या नियुक्तीची माहिती दिली. पण त्यांनी मुनीर यांना का हटवले हे सांगितले नाही. 

वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

२०१७ च्या शेवटी इस्लामाबादमधील आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी झालेल्या फैजाबाद करार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. पाकिस्तानी सैन्यदलावर पुस्तक लिहिलेल्या आएशा सिद्दिकी यांनी हमीद हे अत्यंत कट्टर असल्याचे म्हटले आहे. ते अत्यंत आक्रमक निर्णय घेतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

 

#IndvsPak : विराटची विकेट ही पाकचं 'फादर्स डे' चं गिफ्ट