पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महाग

गॅस सिलिंडर

देशातील सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका बसला आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर महागला आहे. सलग पाचव्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. 

2020 देशवासियांसाठी आनंद घेऊन येईल : PM मोदी

दराचा आढावा घेतल्यानंतर गॅस कंपन्यांनी बिगर अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. आता घरगुती सिलिंडर ७४९ रुपये झाला आहे. तर व्यावसायिक सिलिंडर (१९ किलो) २९.५० रुपयांनी महागले आहे. व्यावसायिकांना आता सिलिंडरसाठी १३२५ रुपये मोजावे लागतील. तर पाच किलो वाला सिलिंडर सात रुपयांनी वाढला आहे. त्याला आता २७६ रुपये द्यावे लागतील. यावेळी घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात २३८.१० रुपयांचे अनुदान जमा होईल. नवीन दर आज (बुधवार) सकाळपासून लागू झाले आहेत.

नव्या वर्षात रेल्वे प्रवासासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम

ऑगस्ट २०१९ मध्ये ६११ रुपये घरगुती सिलिंडरचा दर
ऑगस्ट २०१९ मध्ये ६११.५० रुपये घरगुती गॅस सिलिंडरचा दर होता. तोच दर आता जानेवारी २०२० मध्ये ७४९ रुपये झाला आहे. म्हणजे मागील पाच महिन्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर १३७ रुपयांनी वाढले आहेत. तर व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणाऱ्यांवर २३० रुपयांचा बोजा पडला आहे. 

अशी असेल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची वर्दी