पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अष्टपैलू अभिनयासाठी इरफान खान कायम स्मरणात राहतील - नरेंद्र मोदी

इरफान खान यांचे बुधवारी सकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले.

प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी इरफान खान कायम स्मरणात राहतील, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

अभिनेता इरफान खानचे निधन

ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले, इरफान खान यांच्या निधनामुळे जागतिक सिनेमा आणि रंगभूमी यांचे नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये केलेल्या अष्टपैलू अभिनयामुळे ते कायम स्मरणात राहतील. इरफान खानच्या कुटुंबियांसोबत, मित्र परिवारासोबत माझ्या सदभावना आहेत. ईश्वर आत्म्यास शांती देओ.

चारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन

इरफान खानच्या निधनामुळे संपू्र्ण हिंदी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही इरफान खानला श्रद्धांजली वाहिली आहे. इरफान खान यांचे बुधवारी सकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते एका दुर्धर आजाराने ग्रस्त होते.