पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे वक्तव्य

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

फेब्रुवारीच्या अखेरिस होत असलेल्या भारत दौऱ्याबद्दल आपण उत्सुक आहोत. लाखो लोक आपल्या स्वागतासाठी येणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीला येणार असून, अहमदाबादलाही जाणार आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या दर

आपल्या कार्यालयात पत्रकारांशी नैमित्तिक संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत दौऱ्याबद्दल आपण उत्सुक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. ते खूप चांगले नेते आहेत. गेल्या आठवड्यच्या अखेरिस मी फोनवरून नरेंद्र मोदींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाखो लोक माझ्या स्वागतासाठी येणार असल्याचे सांगितले. विमानतळापासून क्रिकेट स्टेडियमपर्यंत लोक असतील, असे ते मला म्हणाले, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

प्रवाशाला मुंबई पोलिसांकडे नेणाऱ्या 'उबर'च्या चालकावरील बंदी अखेर मागे

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त अहमदाबादमध्ये क्रिकेट स्टेडियम मोठा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. २४ आणि २५ फेब्रुवारीला ते भारतात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अमेरिकेत या वर्षात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Looking forward Donald Trump says friend Modi told him millions would welcome him in India