पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वृत्तपत्रात एक जाहिरात आली आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली

प्रिया चौधरी सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.

संयुक्त जनता दलाचे माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी यांनी रविवारी बिहारमधील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या एका जाहिरातीमुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रिया चौधरी यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःला मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. वृत्तपत्रांतील जाहिरातींमधून त्यांनी ही घोषणा केली. बिहारमध्ये यावर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.

कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांने कोसळले, १९९१ नंतरची सर्वात मोठी घसरण

प्रिया चौधरी या मूळच्या बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील आहेत. पण सध्या त्या लंडनमध्ये राहतात. रविवारी बिहारमधील सर्व प्रमुख हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी एक जाहिरात दिली. पूर्ण पानाच्या या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून जाहीर केले.

गाण्याचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून शेजाऱ्याकडून कुऱ्हाडीने हल्ला

जाहिरातीत त्यांचा उल्लेख अध्यक्षा आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असा करण्यात आला आहे. सध्या बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भाजप आणि लोकजनशक्ती पक्षाचे आघाडी सरकार सत्तेवर आहे.