पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदींनी आदिवासींच्या जमिनी अनिल अंबानींच्या घशात घातल्या'

राहुल गांधी (ANI)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींनी आदिवासींच्या जमिनी अनिल अंबानींच्या घशात घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तुम्ही तुमच्या खिशात हात घाला, पाकीट उघडून पाहा. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पाकिटातील पैसे मोदींनी काढून घेतले आहेत. आदिवासी बंधु-भागिनींनो तुम्ही तुमच्या जंगल,जल, जमिनी पाहा. मोदींनी तुमच्या जमिनी, जंगल अनिल अंबानी यांना दिल्याचे लक्षात येईल, असे ते म्हणाले.

यूपीएच्या काळात १ लाख कोटींची कामं मिळाली, रिलायन्सचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चाईबासा (झारखंड) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, छत्तीसगडमध्ये टाटा कंपनीने पहिल्यांदाच जमीन घेतली होती. त्यांना भाजप सरकारने जमीन दिली होती. पाच वर्षांत त्यांनी आदिवासींच्या जमिनीवर, बस्तरच्या जमिनीवर कोणताच कारखाना सुरु केला नाही. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी टाटाकडून जमीन परत घेतला आणि ती जमीन बस्तरच्या आदिवासींच्या हवाली केली.

दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला राजीव गांधी यांच्या नावावर  निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. हिमत असेल तर निवडणुकीच्या मैदानात या आणि माजी पंतप्रधानांच्या मान-सन्मानाच्या नावावर निवडणूक लढवून दाखवा, असे त्यांनी म्हटले होते. नामदार आणि त्यांचे सहकारी आक्षेपार्ह भाषेत पंतप्रधानांना शिव्या देत असतात. मी एका सभेत जुन्या बोफोर्सच्या भ्रष्टाचाराची आठवण करुन दिली तर वादळ उठले. काही लोकांच्या पोटात तर इतके दुखु लागले की त्यांनी आता रडणेच बाकी होते, असे ते म्हणाले होते.

काय मूर्खपणाय?, राहुल भारतीयच; प्रियांका गांधींचे प्रत्युत्तर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksahba election 2019 congress president rahul gandhi pm narendra modi anil ambani adavasi land