पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीएसटी लागू करणारे सरकार जगात पहिल्यांदाच पुन्हा सत्तेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Loksabha Election Results 2019: विदेशात जिथेही वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला. तिथे हा कर लागू करणाऱ्या सरकारला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण भारतात नेमके याचे उलट झाले आहे. जीएसटी लागू करणारे एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येत आहे.

नवीन अप्रत्यक्ष कर व्यवस्थेला प्रमुख आर्थिक सुधारणेच्या रुपात स्वीकारले गेले आहे, असा याचा अर्थ स्पष्ट होतो. निवडणुकीच्या निकालात सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे ३४९ मतदारसंघात वर्चस्व दिसते.

... आणि लोकसभा निवडणुकीत युतीच्या यशाचे शिलेदार ठरले देवेंद्र फडणवीस

या देशातील सरकारचा झाला होता पराभव 

दुसऱ्या देशांबाबत बोलायचे झाले तर मलेशियातील सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. अशीच परिस्थिती न्यूझीलंड आणि कॅनडा सरकारची झाली होती. ऑस्ट्रेलियातही सरकारला त्याची किंमत चुकवावी लागली होती. या देशांमध्ये कर सुधारणा कार्यक्रमानंतर जीएसटीमुळे किंमती वाढल्या होत्या. यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला होता. याचाच फटका सरकारला बसला होता. एका मोठ्या देशाने जीएसटी लागू केल्यानंतर सरकार पुन्हा सत्तेत येणे, असे पहिल्यांदाच झाल्याचे, एका कर तज्ज्ञाने सांगितले.

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचे सरकार बहुमतापासून दूर

ऑस्ट्रेलियात जॉन हॉवर्ड सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर १९९८ मधील निवडणुकीनंतर बहुमतापासून ते खूप दूर राहिले होते. कॅनडामध्ये १९९३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान किम कॅम्पबेल यांचे सरकार जीएसटी लागू केल्यानंतर पराभूत झाले होते. सिंगापूरमध्ये १९९४ मध्ये जीएसटी लागू करण्यात आले होते. यामुळे तिथे वेगाने महागाई वाढली होती आणि सरकारला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

नरेंद्र मोदी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवले आणि औद्योगिक मागणीवर सक्रियपणे काम केल्याचे एका कर तज्ज्ञाने सांगितले.

lok sabha election result 2019: राजू शेट्टींचा पराभव, नेमकं काय चुकलं ?

सरकार जीएसटी आणखी सुलभ करण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतात जीएसटीचे चार दर आहेत. यामध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू सर्वांत कमी पाच टक्क्यांच्या श्रेणीत आहे.

आणखी एका जीएसटी तज्ज्ञाने सांगितले की, अनेक देशांमध्ये जीएसटी लागू केल्यानंतर तेथील सरकारने यावरुन निर्माण होणाऱ्या अडचणी एका वर्षांत सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, जीएसटी लागू केल्यानंतर एका वर्षाच्या आत तिथे निवडणुका झाल्या. भारतात जीएसटी लागू झालेला कालावधी आणि निवडणुका यात दोन वर्षांचे अंतर होते.

lok sabha election result 2019: हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha electon result 2019 pm narendra Modi creates history In a global first a government that introduced GST has been voted back to power