पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Loksabha election 2019 : सहाव्या टप्यात प.बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात रविवारी ५९ जागांसाठी मतदान झाले. सात राज्यांतील १०.१७ कोटी मतदार या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणार आहेत. एकूण ९७९ उमेदवार यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यातील मतदानाअखेर लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ४८३ जागांवरील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व जागांची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. देशाची राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागांसाठी रविवारीच मतदान झाले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार एकुण ६३.४३ टक्के मतदान झाले आहे. 

यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८०.३३, दिल्ली ५९.७४ , हरियाणा ६८.१७, उत्तर प्रदेश ५४.७२, बिहार ५६. २९, झारखंड ६४.५०, मध्य प्रदेश ६४.५५ टक्के मतदानाची नोंद झाली.

चर्चेतील उमेदवार कोण?
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित उत्तर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवित आहेत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळमधून तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा सोनीपतमधून तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आझमगढमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, नरेंद्र सिंह तोमर आणि हर्षवर्धन यांचेही भवितव्य आजच मतदान यंत्रामध्ये बंद होईल.

एकूण मतदाता : १०,१७,८२,४७२
पुरुष : ५,४२,६०,९६५ 
महिला : ४,७५,१८,२२६ 
तृतीयपंथी : ३,२८१ 
एकूण मतदान केंद्र : १,१३,१६७ 
एकूण उमेदवार : ९७९

ताज्या घडामोडी

दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

बिहार - ४३.८६
हरियाणा - ३९.१६
मध्य प्रदेश - ४८.५३
उत्तर प्रदेश - ४०.९६
पश्चिम बंगाल - ६३.०९
झारखंड - ५४.०९
दिल्ली - ३६.७३

एकूण - ४६.५२

दुपारी २ वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

बिहार - ३५.२२
हरियाणा - ३९.१६
मध्य प्रदेश - ४२.२७
उत्तर प्रदेश - ३४.३०
पश्चिम बंगाल - ५५.७७
झारखंड - ४७.१६
दिल्ली - ३३.६५

दुपारी २ वाजेपर्यंत मतदान

बिहार - ३५.२२
हरियाणा - ३९.१६
मध्य प्रदेश - ४२.२७
उत्तर प्रदेश - ३४.३०
पश्चिम बंगाल - ५५.७७
झारखंड - ४७.१६
दिल्ली - ३३.६५

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केले मतदान

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले मतदान

दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान

बिहार - २०.७०
हरियाणा - २३.२६
मध्य प्रदेश - २८.२५
उत्तर प्रदेश - २१.७५
पश्चिम बंगाल - ३८.२६
झारखंड - ३१.२७
दिल्ली - १९.५५

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वॉड्रा यांनी केले मतदान

युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निर्माण भवन मतदान केंद्रावर केले मतदान

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी केले मतदान

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवार भारती घोष यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी औरंगजेब रस्त्यावरील माध्यमिक शाळेत केले मतदान

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले मतदान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले मतदान

नऊ वाजपर्यंत मतदान

बिहार - ९.०३
हरियाणा - ३.७४
मध्य प्रदेश - ४.०१
उत्तर प्रदेश - ६.८६
पश्चिम बंगाल - ६.५८
झारखंड - १२.४५
दिल्ली - ३.७४

काँग्रेस अध्यक्ष राहुल गाधी मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित

ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार तिवारी यांनी केले मतदान

आपच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतिशी यांनी केले मतदान 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रावर केले मतदान

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पांडव नगर मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कर्नालमध्ये केले मतदान

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले मतदान

गौतम गंभीरनेही रविवारी सकाळी बजावला मतदानाचा अधिकार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने हरियाणातील गुरुग्राममधील मतदारसंघात जाऊन केले मतदान

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते रमण सिंह गोपीबल्लबपूरमध्ये मृतावस्थेत आढळले 

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते अनंता गुचैत आणि रणजित मैती यांच्यावर भागाबानपूर येथे गोळीबार, दोघेही जखमी