पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गौतम गंभीरला निवडणूक आयोगाकडून नोटीस

भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर

भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भारताच्या माजी क्रिकेटर गौतम गंभीरला निवडणूक आयोगाने नोटीस बजावले आहे. अचारसंहिता सुरु असताना एका वर्तमान पत्रामध्ये जाहिरात छापून आल्याचे निदर्शनास आल्याने आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी निवडणूक आयोगाने त्याला नोटीस पाठवले आहे. भाजपने गंभीरला पूर्व दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २६ एप्रिलला एका वर्तमानपत्रामध्ये क्रिकेटच्या गेमसंदर्भातील एका जाहिरातीमध्ये गंभीरचे छायाचित्र छापून आले आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका गंभीरवर ठेवण्यात आला आहे. जाहिरातीमध्ये 'अब मेरे साथ इंडिया खेलेगा' असे हिंदी भाषेतील घोषवाक्य असून विजेत्याला रोख रक्कम दिली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात गंभीरकडे गुरुवार २ मे पर्यंत उत्तर मागितले आहे.  

भाजपने सध्याचे खासदार महेश गिरी यांच्या जागी पूर्व दिल्ली मतदार संघातून गौतम गंभीरला उमेदवारी दिली आहे. दिल्लीतील सात जागेवर निर्वाद यश मिळेल, असे भाजपला वाटत असले तरी गंभीरला निवडणुकीच्या सलामीत चांगलेच आव्हान निर्माण होणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगत आहे. पूर्व दिल्लीत गंभीरला आपचे अतिशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली यांचे आव्हान असेल. ही निवडणुक त्रिशंकू होईल, अशी चर्चा देखील सुरु आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Loksabha Elections 2019 Gautam Gambhir Issued Show Cause Notice Over Poll Code Violation