पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालानंतर काँग्रेसपुढे सर्व पर्याय खुले, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

संयुक्त पुरोगामी आघाडी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्व पर्याय खुले ठेवण्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. निकालांचा आढावा घेऊन त्यानंतर पक्ष पुढील रणनिती आखणार आहे. पण तत्पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधी (NDA) राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम काँग्रेसकडून सुरूच राहणार आहे. आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पक्ष आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसही आपापल्या पातळीवर यासाठी प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीचे निकाल लागल्यावर विरोधी पक्षांच्या एकतेचे चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाने आपल्यापुढील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे समान विचारांच्या पक्षांना एकत्र करण्याचे काम काँग्रेसला करावे लागणार आहे. त्यासाठीच प्रयत्न करण्यात येत आहेत. जर निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. सर्वांच्या मंजुरीने जो निर्णय होईल, तो अंतिम असेल. काँग्रेसला बाजूला ठेवून केंद्रामध्ये गैरएनडीए सरकार सत्तेत येऊच शकत नाही, असेही या नेत्यांने म्हटले आहे.

भाजपने केलेल्या आरोपावर सॅम पित्रोदांचे प्रत्युत्तर

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेऊन त्यांच्यासोबत पुढील रणनितीवर चर्चा केली होती. निवडणुकीच्या मतमोजणी आधी दोन दिवस विरोधी पक्षांची बैठक होणार असून, त्यामध्ये ईव्हीएम आणि मतमोजणीनंतरची रणनिती यावर चर्चा होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे काँग्रेसला वाटते, असे या नेत्याने म्हटले आहे.

'कोणालाच मतदान न करणे हा सुद्धा नागरिकांचा मूलभूत अधिकार'

जर निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर तीनच पर्याय उरतात, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. यामध्ये काँग्रेसने आघाडीचे नेतृत्त्व करावे. दुसरा पर्याय संयुक्त आघाडी सरकारला काँग्रेसने बाहेरून समर्थन द्यावे आणि तिसरा महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी व्हावे.