पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजीव गांधींच्या हत्येवरुन भाजपचे काँग्रेसला उत्तर

काँग्रेसचे दिवगंत नेते राजीव गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांना 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हटल्यापासून देशात सुरु झालेले वादळ शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मोदींना घेरले आहे. भाजपने १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. या सरकारनेच राजीव गांधींना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधानांचे हे वक्तव्य भेकडपणाचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली होती. यावर भाजपनेही त्वरीत प्रतिक्रिया दिली असून त्यांनी काँग्रेसच्या हेतूवर प्रश्न उपस्थितीत केला आहे. 

काँग्रेस म्हणजे 'क्राय बेबी', आचारसंहितेवरुन जेटलींचा पुन्हा हल्लाबोल

भाजप नेते आणि अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी पटेल यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. 'ज्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झाली, म्हणजे डिसेंबर १९९० ते मे १९९१ या काळात काँग्रेसने समर्थन दिलेले चंद्रशेखर सरकार सत्तेवर होते', असे टि्वट त्यांनी केले आहे. 

मे १९९१ ते २००४ पर्यंत काँग्रेस राजीव गांधींच्या हत्येसाठी आपला सहकारी पक्ष डीएमकेला जबाबदार ठरवत असत. इतकेच काय त्यांनी संयुक्त मोर्चा सरकारचा याच आधारावर पाठिंबा काढला होता. २८ वर्षांनंतर काँग्रेसला यात भाजपची भूमिका दिसत आहे, असे दुसरे टि्वट जेटलींनी केले आहे.