पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'NDA-UPA यांच्यात ७८ जागेवर अटीतटीच्या लढती होतील'

भाजप आणि काँग्रेस यांच्यातील लढतींची उत्सुकता शिगेला

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या काही तास बाकी आहेत. जनतेने कुणाला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे, हे  उद्याच्या (गुरुवारी) निकालानंतर स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीतील काही जागांवरील लढती अटीतटीच्या होणार आहेत. ज्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा आहेत.  इंडिया टुडे-एक्सि माय इंडिया एग्झिच पोलनुसार, जवळपास 78 अशा जागा आहेत की, ज्यामध्ये मतांचे अंतर 3 टक्के पेक्षाही कमी असेल. या जागा अशा आहेत की ज्यामुळे सत्ता समीकरणे बदलू शकतात. 

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना केंद्राचा सावधानतेचा इशारा

एक्झिट पोलनुसार, ३७ अशा जागा आहेत ज्याठिकाणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) फायदेशीर ठरतील. त्यातील ३३ जागा भाजपच्या आहेत. दुसरीकडे  १७ अशा जागा आहेत ज्याठिकाणी संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) लाभदायक ठरतील. त्यातील १३ जागा या काँग्रेसशी संबधित आहेत. 

याशिवाय १६ जागा अशा आहेत ज्यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या विजयाचे मार्जिन ३ टक्के पेक्षाही कमी असेल. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील ७ जागा  समाजवादी पार्टी (सपा),  बहुजन समाज पार्टी (बसपा),  राष्ट्रीय लोकदल (रालोद) महा आघाडीशी संबंधित आहेत. आंध्र प्रदेशमधील ३ जागा वायएआर काँग्रेस आणि तेलंगणाची एक जागा ही तेलंगणा राष्ट्र समितीशी संबंधित आहे. 

भाजपसाठी EVM म्हणजे 'इलेक्ट्रॉनिक व्हिक्ट्री मशीन': काँग्रेस

एक्झिट पोलनुसार आठ अन्य जागेवरील मताचे मार्जिन अधिक कमी असेल. त्यामुळे या जागेवर नक्की कोणाला विजय मिळेल हे सांगणे कठीण आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. परंतु याचा भाजपला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असे नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजप भलेही प्रमुख दावेदार नसेल परंतु उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सपा-बसपा-रालोद या महाआघाडीसोबत तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी लक्षवेधी लढत असेल.