पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आता पुढची तयारी', अखिलेश-मायावती यांच्यात तासभर चर्चा

अखिलेश यादव आणि मायावती

एक्झिट पोलचा कल एनडीएच्या बाजूने झुकल्याने विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार असे चित्र दिसत असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज (सोमवारी) बसपा सुप्रिमो मायावती यांची भेट घेतली. अखिलेश यादव यांनी 'आता पुढची तयारी' या कॅप्शनसह ट्विटच्या माध्यमातून मायावतींसोबतचा फोटो शेअर केला आहे.  

कमलनाथ सरकार अल्पमतात, भाजपचा राज्यपालांकडे दावा

अखिलेश यादव यांनी दुपारच्या दरम्यान बसपा सुप्रिमो मायावती यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आगामी व्यव्हूरचनेसाठी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीपर्वीच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांनी युती केली होती. यूपीमध्ये या पक्षांनी यंदाच्या निवडणूका एकत्रित लढवल्या होत्या.  

एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील रणनितीसंबंधीत खुलासा हा निवडणुकीच्या अंतरिम निकालानंतर केला जाईल. तोपर्यंत बहनजी (मायावती) लखनऊमध्येच असतील. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सपा-बसपा आघाडी उत्तर प्रदेशमधील २०१४ मध्ये भाजपला मिळालेल्या जागा कमी करण्यात यशस्वी होईल मात्र त्यांना सत्तेपासून रोखण्यात आघाडीला यश येणार नाही, असेच चित्र आहे.  
आघाडीच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील यावर अजूनही विश्वास नाही. भाजपस सहजासहजी सत्ता स्थापन करु शकणार नाही, असेच त्यांना वाटते. 

Lok Sabha election 2019 Exit Poll: बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

आणखी एका नेत्याने म्हटले आहे की, "आम्हाला (सपा-बसपा-रालोद) कोणत्याही परिस्थितीत ५५ पेक्षा कमी जागा मिळतील असे वाटत नाही. आम्हाला ८० पैकी ६० जागांवर यश मिळेल, असा विश्वास आहे. आम्ही एक्झिट पोलच्या अंदाजाशी सहमत नाही, असेही ते म्हणाले. 
पक्षाच्या नेत्यांना २३ मे रोजी निकालानंतरच दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तोपर्यंत आपापल्या कार्यक्षेत्रार राहावे, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती एका नत्याने दिली. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला-७१ भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या अपना दल-२, समाजवादी पार्टी -५, काँग्रेस- २ तर बसपाला खातेही उघडता आले नव्हते.