पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तिथे आम्ही भजन करायला जात नाही: योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसप्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. लोकसभेच्या प्रचारादरम्यान भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. याप्रकरणी एएनआयशी बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, प्रचाराच्या व्यासपीठावर आम्ही भजन करायला जात नाही. आम्ही तिथे विरोधकांचा सामना करायला जात असतो. 

उत्तर प्रदेशमधील संबलमध्ये १९ एप्रिलला घेतलेल्या प्रचारसेभेतील भाषणात योगी आदित्यनाथ यांनी 'बाबर की औलाद' असा उल्लेख केला होता. याप्रकरणी गुरुवारी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. जे स्वत:ला बाबरचा वारस मानतात अशा लोकांच्या हाती तुम्ही देशाची सत्ता द्याल का? अशा आशयाचे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते. 

 

योगी आदित्यनाथ यांच्याकडे पक्षातील कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. यापूर्वी निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रचारादरम्यानच्या भाषणावर तीन दिवसांची बंदी घातली होती. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपा यांचा जर अलीवर विश्वास असेल तर आमची बजरंगबलीवर श्रद्धा आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:LokSabha Election 2019 Yogi Adityanath Counter On EC Hate Speech Notice sys can not be singing bhajan