पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर सनीला निवडणुकीला उभे केले नसते- धर्मेंद्र

धर्मेंद्र आणि सनी देओल

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. गुरदासपूर मतदारसंघातून जर सुनील जाखड  काँग्रेसचे उमेदवार आहेत हे माहीत असते तर सनी देओलला येथून निवडणूक लढवण्याची परवानगी दिली नसती असे म्हटले आहे. सनी देओल हे गुरदासपूर येथून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी सनी यांच्यासाठी प्रचारही केला आहे. गुरदासपूरला १९ मे रोजी मतदान होणार आहे.  

'सनी देओल-सनी लिओनीही काँग्रेसचे वादळ रोखू शकत नाहीत'

धर्मेंद्र माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बलराम जाखड मला भावाप्रमाणे होते. त्यांचे पुत्र सुनील जाखड हे गुरदासपूर येथून निवडणूक लढवत असल्याचे मला माहीत असते तर मी सनीला त्यांच्याविरोधात लढण्याची परवानगीच दिली नसती. सनी हा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे तो जाखड यांच्यासारख्या अनुभवी नेत्याबरोबर वाद आणि निवडणुकीच्या स्पर्धेत सामना करु शकणार नाही. 

सुनील हेही माझ्या मुलासारखे आहेत. माझे त्यांचे वडील बलराम जाखड यांच्याबरोबर चांगले संबंध होते. बलराम जाखड हे अत्यंत अनुभवी नेते होते. आम्ही चित्रपट क्षेत्रातून येतो. आम्ही येथे वाद घालायला आलेलो नाही. आम्ही लोकांच्या समस्या ऐकायला आलो आहोत. येथील लोकांवर आम्ही प्रेम करतो, असेही ते म्हणाले. रोड शो दरम्यान लोकांची झालेली गर्दी आणि सनी देओल यांच्या प्रती लोकांनी दाखवलेले प्रेम पाहून धर्मेंद्र हे भावूक झाले होते. 

अभिनेता सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, दिवंगत भाजप खासदार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर २०१७ मध्ये या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड हे विजयी झाले होते. या मतदारसंघावर भाजपचा दबदबा राहिलेला आहे. १९९८ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Wouldnt have allowed Sunny to contest had I known Sunil Jakhar was his opponent says Dharmendra