पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधी आपला वेळ का वाया घालवताहेत, केजरीवाल यांचा प्रश्न

अरविंद केजरीवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये आपला वेळ का वाया घालवताहेत, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे आप आणि सपा-बसपा आघाडी यांची थेट लढत भाजपशी होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

केजरीवाल यांना पुन्हा धक्का, आणखी एक आमदार भाजपमध्ये

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, प्रियांका गांधी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाचा प्रचार का करीत नाहीत. त्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाविरोधात प्रचार सभा घेत आहेत. दिल्लीमध्ये आपच्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत. हे दोघेही बहिण भाऊ (प्रियांका गांधी आणि राहुल गांधी) जिथे भाजपशी त्यांची थेट लढत आहे, तिथे का जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

जाणून घ्या केजरीवालांसोबत घडलेल्या धक्कादायक घटना

दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे प्रयत्न सुरुवातीला झाले होते. पण ही आघाडी होऊ शकली नाही. राहुल गांधी यांनी यासाठी अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले होते. तर दुसरीकडे ट्विटरच्या माध्यमातून आघाडीची बोलणी होत नसतात, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी यासाठी राहुल गांधी यांना जबाबदार धरले होते. आता निवडणुकीत आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढत होते आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 why priyanka gandhi wasting her time in up and delhi asks arvind kejriwal