पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२३ तारखेलाच समजेल कोण दुर्योधन, कोण अर्जुन, शहांचे प्रियांकांना प्रत्युत्तर

अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुर्योधनासारखे अहंकारी होते, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका यांनी मोदींनी दुर्योधन म्हटले आहे. प्रियांकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटल्यामुळे कोणी दुर्योधन होत नाही. आपण २३ मे रोजी पाहुयात कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन आहे, असेही ते म्हणाले. ते पश्चिम बंगालमधील विष्णुपूर येथील सभेत बोलत होते. 

मोदींमुळे देशाचे संरक्षण आणि मुत्सद्देगिरी स्वतंत्र - अमित शहा

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम'वरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु झालेल्या शाब्दिक वादात अमित शहा यांनीही उडी घेतली. बंगालमधील मेदिनीपूर येथील सभेत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शहा यांनी व्यासपीठावरुन जय श्रीरामची घोषणा दिली आणि काय करायचे ते करा असा दमच दिला. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच मोदींनी जय श्रीरामच्या घोषणेचा मुद्दा उठवला होता. 

मी ममता दिदींना विचारु इच्छितो की, श्रीराम हे नाव भारतात घेणार नाही तर काय पाकिस्तानमध्ये घेणार का, श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, भारताचे संरक्षण विषयक धोरण हे आता राजकीय मुत्सद्देगिरीशी जोडलेले नसल्याचे शहा यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. राजकीय मुत्सद्देगिरीने भारत आपली मते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठामपणे मांडेल. त्याचवेळी संरक्षणाच्या दृष्टीने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करायला मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी परखडपणे सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 We will find out on May 23 who is Duryodhana and who is Arjuna says amit shah