पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालापूर्वीच मोटबांधणीची तयारी, चंद्राबाबूंनी घेतली मायावतींची भेट

चंद्राबाबू नायडू आणि मायावती

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी मोटबांधणीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या भेटीनंतर आपला मोर्चा उत्तर प्रदेशकडे वळवला. शनिवारी संध्याकाळी त्यांनी लखनऊमध्ये जाऊन बसपा सुप्रिमो मायावती यांची भेट घेतली. 

यावेळी नायडू यांनी आंध्र प्रदेशवरुन आणलेल्या आंब्यांची पेटी मायावतींना भेट म्हणून दिली. यापूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीच्या कार्यालयात सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. लखनऊ विमानतळावर उतरल्यानंतर नायडू सर्वप्रथम समाजवादी पार्टीच्या कार्यालयात पोहचले. अखिलेश यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.  

 राजकीय समीकरणांना वेग, चंद्राबाबूंनी घेतली शरद पवारांची भेट

यापूर्वी नायडू यांनी तृणमूल कांग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि माकपाचे महासचिव सीताराम येच्चुरी यांच्यासोबत बैठकी केल्या आहेत. मायावती आणि अखिलेश यादव यांना भेटण्यापूर्वी चंद्राबाबूंनी आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाकप नेता जी. सुधाकर रेड्डी, आणि डी. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.