पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममताजींनी पातळी ओलांडली, सुषमा स्वराज यांचे ट्विट

सुषमा स्वराज

पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर टीका करण्याच्या मुद्द्यावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ममताजींनी पातळी ओलांडली आहे, असे सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सुषमा स्वराज यांनी बशीर बद्र यांचा एक शेरही आपल्या ट्विटमध्ये लिहिला आहे.

नुसतेच जय श्रीराम म्हणता, एकतरी राम मंदिर बांधले का?, ममतांचा मोदींना सवाल

ममताजी, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच बोलावे लागणार आहे. त्यासाठीच तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शेरची आठवण करून देते, असे सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, 
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी म्हटले होते की, पंतप्रधानांना लोकशाहीची एक थप्पड पडली पाहिजे. त्यांच्या याच वक्तव्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी यांना तुम्ही सर्व पातळ्या ओलांडल्या असल्याचे म्हटले.

२३ तारखेलाच समजेल कोण दुर्योधन, कोण अर्जुन, शहांचे प्रियांकांना प्रत्युत्तर

पुरुलियातील रघुनाथपूरमध्ये आयोजित प्रचारसभेमध्ये बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, राजकारणात मी माझी मान वाकू देणार नाही. केवळ घोषणा देण्यात मी त्यांची साथ देणार नाही. त्यापेक्षा मी 'जय हिंद' म्हणेन. पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार दुर्गापूजा आणि अन्य धार्मिक विधींना परवानगी देत नाही, असा आरोप पंतप्रधानांनी माझ्यावर केला आहे. तुम्हाला हा आरोप खरा वाटतो का, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 sushma swaraj attacks mamata banerjee over remark on pm narendra modi