पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

समाजवादी पक्षाकडून मायावतींची फसवणूक, मोदींचा आरोप

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर जोरदार टीका केली. एकीकडे बसपाच्या अध्यक्षा मायावती काँग्रेसवर कडवी टीका करीत असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाने काँग्रेसबद्दल ब्र काढलेला नाही, हे दाखवून देत काँग्रेस आणि समाजवादी पक्षात अंतर्गत काहीतरी शिजते असल्याचा आरोप मोदींनी केला.

उत्तर प्रदेशातील प्रतापगढमध्ये मोदींची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी हे सुद्धा उपस्थित होते.

विश्लेषण : 'फिल गुड' मुद्द्यामुळे मोदी जिंकणार की हारणार?

नरेंद्र मोदी म्हणाले, समाजवादी पक्षाने महाआघाडीचे गाजर दाखवून मायावती यांच्या पक्षाचा वापर करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी स्वतःचे मूळ हेतू मायावती यांच्यापासून लपवून ठेवून त्यांना फसवले आहे. मायावती यांना पंतप्रधानपदाचे आमिष दाखवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण आता मायावती यांना त्यांचा मूळ हेतू लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे त्याच जाहीरपणे काँग्रेसवर टीका करीत आहेत.

मोदी सोडा, भाजपचा कोणताच नेता पुढचा पंतप्रधान होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसच्या नेत्यांबद्दल प्रश्न विचारला की समाजवादी पक्षाचे नेते गप्प बसतात. त्याचवेळी काँग्रेसचे नेते समाजावादी पक्षाच्या सभांना उपस्थित असतात. त्यांनी मायावतींना असे फसविण्याची गरज नाही. अर्थात त्यांना अजून आपली कशी फसवणूक झाली आहे, हे पूर्णपणे कळले नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 SP kept Mayawati in dark shared stage with Cong leaders narendra modi