पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्यावरील लोकांचे प्रेम बघितल्यावर सपा, बसपाचा BP वाढतो - मोदी

लोकसभा निवडणुकीत भाषण करताना नरेंद्र मोदी

सामान्य लोकांचा मला आणि माझ्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघितल्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांचा रक्तदाब Blood Pressure वाढतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये तेथील महाआघाडीवर टीका केली. अयोध्येजवळील आंबेडकर नगरमधील जाहीर सभेत त्यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.

मोदींवर ७२ वर्षांची भाषण बंदी घाला, अखिलेश यांची मागणी

नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांच्या नावाचा वापर सपा आणि बसपाकडून केवळ राजकीय फायद्यासाठी केला जातो. त्यांचे विचार यांच्याकडून कधीच आचरणात आणले जात नाहीत. सपा असू दे किंवा बसपा असू दे किंवा काँग्रेस. सगळे एकसारखेच आहेत. बहेनजी, (मायावती) बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते. पण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध वागते. समाजवादी पक्षाचे नेते राम मनोहर लोहिया यांचे नाव घेतात. पण त्यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था उद्धवस्त करून ठेवली आहे, अशी टीका त्यांनी केली. 

आपल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या बिमोडाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रात एक हाती सत्ता असेल, तरच दहशतवादाचा बिमोड करणे शक्य आहे. भारतात कमकुवत सरकार सत्तेत यावे, अशी दहशतवाद्यांचीही इच्छा असल्याचे सांगत त्यांनी केंद्रात कणखर सरकार निवडून देण्याचे आवाहन केले.

प. बंगालचे ४० आमदार माझ्या संपर्कात - नरेंद्र मोदी

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ तासांची नव्हे, ७२ वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी केली होती. तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावरून अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 SP BSPs blood pressure shoots up when they see love for me narendra modi in Ayodhya