पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधी नवऱ्याच्या नावापेक्षा माझे नावे जास्त घेतात, स्मृती इराणी

स्मृती इराणी

अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर सोमवारी जोरदार टीका केली. सध्या प्रियांका गांधी या त्यांच्या नवऱ्याच्या नावापेक्षा माझे नाव जास्त घेतात. पाच वर्षांपूर्वी त्यांना माझे नावही माहिती नव्हते. पण पाच वर्षात चित्र बदलले. आता त्या सतत माझे नाव घेतात. माझ्यासाठी हे गौरवास्पदच असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. एएनआयने हे ट्विट केले आहे.

अमेठीमध्ये एका रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेवरूनही स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विश्वस्त असलेल्या एका रुग्णालयात उपचारांअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्या रुग्णाकडे आयुष्यमान भारतचे कार्ड असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी गांधी घराण्यावरही टीका केली. एका निर्दोष व्यक्तीला केवळ राजकारणासाठी मृत्यूच्या दरीत लोटण्यास हे कुटुंब तयार असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला.

काँग्रेसने प्रामाणिक वॉचमनला पंतप्रधान केले, मोदींची मनमोहन सिंगांवर टीका

अमेठी हा गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवतात. गेल्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपने स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या पराभूत झाल्या होत्या. पण त्यावेळेपासून त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. यावेळीही त्या अमेठीतूनच राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.