पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लालूपु्त्राच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, पत्रकाराला केली मारहाण

तेजप्रताप यादव यांच्या बॉडीगार्डने कॅमेरामनला मारहाण केली.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांच्या सुरक्षारक्षकांची दादागिरी समोर आली आहे. पाटणा येथे तेजप्रताप यांच्या सुरक्षारक्षकांनी एका छायाचित्रकाराबरोबर गैरवर्तन करत बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने मारहाण करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या मारहाणीत तेजप्रताप यांच्या कारची काचही फुटली आहे. तेजप्रताप हे मतदानासाठी इ-रिक्षामध्ये आले होते. त्यावेळी माध्यमकर्मींची मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दीत एका छायाचित्रकाराच्या पायावरुन इ-रिक्षाचे चाक गेले. त्यावेळी झालेल्या गोंधळावेळी सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकाराला बेदम मारहाण केली. दरम्यान, तेजप्रताप यांनी मारहाणीचा आरोप फेटाळला असून उलट मलाच जीवे मारण्याचा प्रयत्न कट रचल्याचे म्हटले आहे. या घटनेप्रकरणी आपण तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींना दुर्योधन नव्हे जल्लाद म्हणा, राबडी देवींची मुक्ताफळं

छायाचित्रकाराचे नाव रंजन राही असल्याचे सांगण्यात येत आहे. राही यांनी पायावरुन रिक्षाचे चाक काढण्यासाठी सांगितल्यानंतर तेजप्रताप यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी या सुरक्षारक्षकांनी शिवीगाळही केली. गोंधळादरम्यान तेजप्रताप यांच्या कारची काचही फुटली. तेजप्रताप यांनी यासाठी माध्यमांनाच दोषी ठरवले आहे. 

आवडत्या पक्षाला आईने मत दिले नाही म्हणून त्याने EVM फोडले


मला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मी आता एफआयआर दाखल करण्यास जात आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Rjds Tej Pratap Yadavs personal security guards in Patna beat a camera person