पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सनी देओल-सनी लिओनीही काँग्रेसचे वादळ रोखू शकत नाहीत'

सनी लिओनी आणि सनी देओल

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. प्रचारात विकासाच्या मुद्द्यांबरोबर वैयक्तिक टीकाही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकार मागील ५ वर्षांत सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपला ३ मतदारसंघात उमेदवारही मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरुदासपूर येथून अभिनेता सनी देओलला उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सनी देओल किंवा सनी लिओनीला आणू शकतील पण काँग्रेसच्या वादळासमोर कोणी टिकू शिकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

२०१४ मध्ये भाजपने होशियारपूर आणि गुरुदासपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. पंजाबमधील होशियारपूरसह सर्व १३ जागांवर सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. काँग्रेसने होशियारपूरमधून राजकुमार चब्बेवाल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने विद्यमान खासदार विजय सांपला यांच्यऐवजी सोमप्रकाश यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Raj Kumar Chabbewal Congress candidate Hoshiarpur Sunny Deol Sunny Leone pm modi