पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी तोफ तर मी AK-47: नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. २०१४ मध्ये मोदी हे गंगाच्या (नदी) मुलाच्या रुपात आले होते. पण यावेळच्या निवडणुकीनंतर ते राफेलचे दलाल म्हणून जातील, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

काँग्रेसच्या एका प्रचारसभेत ते बोलत होते. राफेल करारावरुन त्यांनी मोदींवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मोदींना देशात कुठेही चर्चा करण्याचे आव्हान दिले. राहुल गांधी हे एक मोठे व्यक्ती आहेत. ते एक तोफ असून मी AK-47 आहे, असे ते म्हणाले. 

२८ दिवसांत ८० प्रचारसभा, सिद्धूंच्या घशाला सूज; आता सक्तीची विश्रांती

'न खाऊंगा और न खाने दूंगा' यावर मी मोदींनी आव्हान देतो. जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडून देईन, असे त्यांनी म्हटले. मी सांगू इच्छितो की मोदी हे २०१४ मध्ये गंगेच्या (नदी) मुलाच्या रुपात आले होते. पण २०१९ मध्ये ते ते राफेलचे दलाल म्हणून जातील, अशी टीका त्यांनी केली. 

दरम्यान, सातत्याने बोलल्यामुळे सिद्धू यांच्या स्वरयंत्रावर परिणाम झाला होता. अनेकवेळा त्यांच्या घशातून रक्तही निघाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांनी बोलण्यास मनाई केली होती. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात केली आहे. 

राहुल गांधी हारले, तर मी राजकारण सोडेन - नवज्योत सिंग सिद्धू