दहशतवाद्यांपासून देश सुरक्षित ठेवण्याच्या भाजपच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्ला चढवला. देशातील शेतकऱ्यांची शेतीही सुरक्षित ठेवा, हा सुद्धा राष्ट्रवादच असल्याचा टोमणा त्यांनी भाजपला मारला. आपला देश लोकांमुळे तयार झाला आहे. लोकांचे प्रेम याचाच अर्थ लोकांचा आदर करणे. जनतेचा आदर करणे म्हणजेच ते जर काही सांगत असतील, तर ते ऐकणे. जनतेचा आवाज हाच लोकशाहीचा आवाज असतो. आज मी प्रचाराच्या निमित्ताने जिथे जिथे जाते तिथे तिथे लोक मला भटक्या जनावरांबद्दल सांगतात, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
काय मूर्खपणाय?, राहुल भारतीयच; प्रियांका गांधींचे प्रत्युत्तर
थुलवासामध्ये आपली आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी एका कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. लोक जेव्हा आपल्या मागण्यांसाठी आवाज काढतात. त्यावेळी त्यांचा आवाज दाबला जातो. शिक्षकांसोबत आणि शेतकऱ्यांसोबत हेच घडले आहे. सरकार असे का करते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुमच्या एकजुटीला सरकार घाबरते. पाच वर्षांपूर्वी जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण झालेली नाहीत. जनतेच्या प्रश्नांची उत्तर सरकारकडे नाहीत. त्यामुळेच तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. केंद्रात एकहाती सत्ता असूनही जनतेच्या भल्याचे एक सुद्धा काम करण्यात आले नाही, असाही आरोप त्यांनी सरकारवर लावला.
सभ्य लोकांनी मुलांना प्रियांका गांधींपासून दूर ठेवावे- स्मृती इराणी
सरकारने केवळ प्रचार करण्याचे काम केले आहे. जेव्हा तुम्ही टीव्ही लावता, त्यावेळी तुम्हाला फक्त प्रचारच दिसतो. जेव्हा वृत्तपत्र हातात घेता, त्यावेळीही त्यांचाच चेहरा दिसतो. जाहीर सभांमध्ये निम्मे भाषण विरोधकांवर टीका करण्यातच जाते. राष्ट्रवादी तर सगळेच आहेत. राष्ट्रवादी असण्याचा अर्थ काय आहे, सर्वात मोठा राष्ट्रवाद कोणता, असे प्रश्नही त्यांनी सरकारला विचारले.