पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) वाराणसी मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करताच मोदींनी सर्व सूचकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिला सूचक अन्नपूर्णा शुक्ला यांचे आर्शीवाद घेतले.
#WATCH: PM Narendra Modi files nomination from Varanasi parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ym9x2gCYYG
— ANI UP (@ANINewsUP) April 26, 2019
तत्पूर्वी मोदींनी बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी कालभैरवचे दर्शन घेतले. पुजा केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. तिथे एनडीएचे दिग्गज नेते आधीच दाखल झाले होते. यावेळी मोदींनी प्रकाशसिंग बादल यांचे आर्शीवाद घेतले.
#LokSabhaElections2019 : PM Narendra Modi files nomination from Varanasi parliamentary constituency. pic.twitter.com/V0RX2otJUv
— ANI UP (@ANINewsUP) April 26, 2019
तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसीत भव्य ‘रोड शो’द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोदी यांनी सुमारे सात किलोमीटपर्यंतच्या ‘रोड शो’ची सुरुवात केली होती. गंगा आरतीनंतर त्यांनी एका सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले होते.