पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून चावी फिरवली की अर्थव्यवस्था चालू'

राहुल गांधी (ANI)

'न्याय' योजना भारताच्या अर्थव्यवस्थेत ट्रॅक्टरमधील डिझेलप्रमाणे असेल. ही योजना लागू झाल्या नंतर देशातील अर्थव्यवस्था पुन्हा चालू होईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाटणा येथील प्रचारसभेत केले. 

राहुल गांधी तोफ तर मी AK-47: नवज्योतसिंग सिद्धू
 
ते म्हणाले, ज्यापद्धतीने ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते. त्याचपद्धतीने न्याय योजना भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलप्रमाणे असेल. आम्ही डिझेल टाकणार. चावी फिरवणार आणि भारताची अर्थव्यवस्था पुन्हा चालू होईल. लोकांना रोजगार उपलब्ध होईल. 

मी कधीच मोदींच्या कुटुंबीयांचा अपमान करणार नाहीः राहुल गांधी

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सकाळी अलवर जिल्ह्यातील थानागाजी येथे जाऊन सामूहिक बलात्कार पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल यांच्याबरोबर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हेही उपस्थितीत होते. 'ही घटना (अलवर सामूहिक बलात्कार) ऐकल्यानंतर मी त्वरीत याबाबत अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली. हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यांना न्याय मिळेल.' दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 nyay scheme in economy is like diesel in tractor says congress president rahul gandhi in patna