पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकणार नाही : संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही दिवस बाकी असताना भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही, असे म्हटले आहे. भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) सत्ता स्थापन करावी लागेल, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले. 

लोकसभेच्या सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) एक प्रमुख घटक पक्ष आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.  

संजय राऊत म्हणाले की, "सध्याच्या घडीला काही छोटे पक्ष एनडीएसोबत नाहीत. मी सुरुवातीपासूनच एनडीए सरकार सत्ता स्थापन करेल, असे सांगत आहे. मी पुन्हा पुन्हा एनडीए हा शब्द उच्चारत आहे. सध्याच्या घडीला एनडीएसोबत नसणाऱ्या काही घटक पक्षांना चांगल्या जागा मिळतील. आणि ते एनडीएमध्ये सहभागी होतील, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.  

पंतप्रधानपदासाठी पवारांना विरोध, मायावतींना पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार सत्तेत आले तरी ते देशाला स्थिर सरकार देऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे भाकीत खरे होणार नाही, असे सांगत राऊत म्हणाले की, "यापूर्वी अनेक घटक पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले आहे. तसेच आपला संपूर्ण कार्यकाळही पूर्ण केला आहे. त्यामुळे एनडीए सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल."  मागील आठवड्यात भाजपमधील दिग्गज नेते राम माधव यांनी भाजप बहुमतापासून दूर राहण्याचा अंदाज वर्तवला होता. 

'...तेव्हा मोदी मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवायचे, आता लोक मोदींची खिल्ली उडवताहेत'

यावेळी राऊत यांनी मंगळवारी कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर टिप्पणी केली. ही घटना देशातील लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गुजरातमध्ये प्रचाराची परवानगी नाकारल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अमित शहा आणि मोदींच्या प्रचार सभेला विरोध केला जात आहे का? या प्रश्नावर देशातील कोणताही नेता कोणत्या भागात प्रचार सभा घेण्याचे स्वतंत्र असल्याचे राऊत यांनी सांगितले. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Loksabha election 2019 NDA Partners Shivsena Leader Sanjay Raut Doubt BJP will get majority