पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२८ दिवसांत ८० प्रचारसभा, सिद्धूंच्या घशाला सूज; आता सक्तीची विश्रांती

नवज्योतसिंग सिद्धू

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या घशाला सूज आली आहे. सिद्धू यांनी गेल्या २८ दिवसांत ८० प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे त्यांच्या स्वरयंत्रावर ताण पडला आहे.

सातत्याने बोलल्यामुळे त्यांच्या स्वरयंत्रावर परिणाम झाला आणि अनेकवेळा त्यांच्या घशातून रक्तही निघाले. आता त्यांची प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे. त्यांना आवश्यक ती औषधे देण्यात आल्याचे सिद्धू यांच्या कार्यालयाने सांगितले आहे.

राहुल गांधी हारले, तर मी राजकारण सोडेन - नवज्योत सिंग सिद्धू

सिद्धू यांनी रविवारी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना काही इंजेक्शन आणि स्टेरॉइड घेतल्यास ४८ तास आराम करण्याचा किंवा त्यांच्या गळ्याभोवती बामचे कोटिंग केल्यास त्यांना तीन ते चार दिवस बोलता येणार नाही, असे दोन पर्याय दिले आहेत. 

सिद्धू हे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील चार दिवसात प्रचारावर जोर दिला होता. सध्या ते इंजेक्शन आणि स्टेरॉइड घेत आहेत. पुढील २ दिवस ते आराम करतील कारण बाम कोटिंगमुळे पुढील चार दिवस ते बोलू शकणार नाहीत. सध्या ते औषध घेत असून लवकरच निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.

मोदींविरोधातील वक्तव्य भोवणार, सिद्धूंना 24 तासांचा अल्टिमेटम!

सिद्धू हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. १४ मे रोजी पाटणासाहिब, १५ मे रोजी विलासपूर आणि हिमाचल प्रदेश येथे त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

मागील वर्षी डिसेंबरमध्येही डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. १७ दिवस प्रचार केल्यानंतर त्यांच्या स्वरयंत्रावर परिणाम झाला होता.