पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'योगींना अजय सिंह बिश्त म्हणणे संस्कृतीचा अपमान', काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत युवकाचा गोंधळ

युवकाचा काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ (ANI)

एका युवकाने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घालत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अजय सिंह बिश्त असा उल्लेख करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचे म्हटले. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात प्रवक्ते पवन खेरा हे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचवेळी एक युवक आला आणि त्याने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने हातात तिरंगा घेऊन वंदे मातरमची घोषणा दिली. नंतर सुरक्षारक्षक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बाहेर काढले. 

... तिथे आम्ही भजन करायला जात नाही: योगी आदित्यनाथ

या युवकाचे नाव नचिकेत असून तो महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. त्याने योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेस प्रवक्त्यांकडून वारंवार अजय सिंह बिश्त म्हणून उल्लेख होत असल्याचा निषेध केला आणि जोरजोरात घोषणा देऊ लागला. त्याने तिरंगा फडकावला आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बाहेर काढले. खेरा यांनी या गोष्टीला महत्व दिले नाही. त्यांना यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मोदींवर ७२ वर्षांची भाषण बंदी घाला, अखिलेश यांची मागणी