पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममता बॅनर्जी यांचे निवडणूक आयोगाला पत्र 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उद्या (रविवारी) अखेरच्या टप्प्यात होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासंदर्भात विनंती केली आहे. राज्यातील मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडावी, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी आपल्या पत्रात लिहलंय की, "निवडणूक आयोगाने प. बंगालमध्ये रविवारी होणाऱ्या मतदान प्रक्रिया केंद्र सरकार आणि राज्यातील सत्ताधारी यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार पाडावे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उद्या (रविवारी) मतदान होत आहे. "मी तुमच्या कार्यालयाला विनंती करते की, निवडणूक शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडावी. केंद्र सरकार तसेच सत्ताधारी सरकारचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी."

ममतांच्या भाच्याने PM मोदींना धाडली अब्रुनुकसानीची नोटीस

दुसरीकडे माकपने मतदानावेळी तृणमूल काँग्रेसकडून अनुचित प्रकार घडू शकतो, अशी शंका व्यक्त केली. त्यांनी मतदान निष्पक्ष आणि भयमुक्त पार पडावे यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले. डायमंज हर्बर आणि जावपूरसह अन्य जागेसाठीच्या मतदाना दरम्यान गदारोळ होण्याची शक्यता असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे.

उल्लेखनिय आहे की, लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आठ राज्यातील ५९ जागेसाठी १९ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पश्चिम बंगामध्ये ९ जागांसाठी मतदान होणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 mamata banerjee asks ec to ensure peaceful and impartial voting in west bengal in the last phase