पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सहाव्या टप्प्यात भाजप, काँग्रेसला उत्तर प्रदेशात ० जागा मिळतील'

अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होते आहे. या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजप आणि काँग्रेसला शून्य जागा मिळतील, असे भाकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले आहे. पण त्याचवेळी सातव्या टप्प्यामध्ये त्यांना काही जागा मिळतील, असेही त्यांनी म्हटले आहे. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे. 

आता सक्रिय राजकारणात आले नसते तर भेकडपणा ठरला असता - प्रियांका गांधी

अखिलेश यादव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला जे काही करायचे आहे. त्यासाठी ते इतरांना दोष देत आहेत. भाजप जातीवर आधारित राजकारण करतो आहे. त्याचबरोबर समाजात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल, अशी वक्तव्ये करतो आहे. भाजपचे सरकारच खोटेपणा आणि द्वेष निर्माण करण्याच्या आधारावर सत्तेत आले आहे. पण यावेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने मिळून यांना सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे. 

उद्या ज्या मतदारसंघात मतदान होते आहे. तिथे सपा-बसपाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात नोटिसा जारी करण्याच्या सूचना भाजपकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यांना मतदानापासून रोखण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. मागच्यावेळीही आम्ही याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, असे अखिलेश यादव म्हणाले. त्याचबरोबर भाजपचे सर्व कार्यकर्ते एकदम स्वच्छ आहेत का, त्यांच्यावर गुन्हेगारीचे कोणतेही आरोप नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 In the 6th phase of elections BJP and Congress will win zero seats says Akhilesh Yadav