पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी कन्हैय्याकुमारचा समर्थक, आरजेडीने मोठी चूक केली-दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह (छायाचित्र: एएनआय)

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा पक्ष विरोधी वक्तव्य करत आपण कन्हैय्याकुमार यांचे समर्थक असल्याचे म्हटले आहे. कन्हैय्याकुमार हे कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर  बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तिथे त्यांचा सामना भाजपचे गिरीराज सिंह आणि आरजेडीचे तन्वीर हसन यांच्याशी होत आहे. बेगुसराय येथे आज (सोमवार) मतदान होत आहे.

भोपाळ येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी कन्हैय्याकुमारचा समर्थक असून आरजेडीने मोठी चूक केल्याचे मी माझ्या पक्षात ही बोललो आहे. ही जागा सीपीआयला द्यायला हवी होती. ते ८ किंवा ९ तारखेला माझ्या प्रचारासाठी भोपाळला येत आहेत, याचा मला आनंद आहे. 

भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांचा सामना भाजपाच्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्याशी होत आहे. 

यंदा बेगुसरायमधील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. कारण कन्हैय्याकुमार आणि गिरीराज सिंह दोघेही भूमिहार समाजाचे आहेत. विशेष म्हणजे दोघेही लोकप्रिय आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, कन्हैय्याकुमारला दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळत आहे. 

दुसरीकडे दिग्विजय सिंह हे भोपाळमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. भोपाळ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. परंतु, दिग्विजय सिंह यांच्या उमेदवारीमुळे येथील लढतही रंगतदार ठरणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 i am supporter of Kanhaiya Kumar rjd makes big mistake in Begusarai says digvijay singh