पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गौतम गंभीरचे केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान, पण एक अट

गौतम गंभीर

माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान दिले आहे. चर्चा करायला मी घाबरत नाही, असे सांगतानाच गौतम गंभीर म्हणाला, मी पाकिस्तानला घाबरत नाही, तर चर्चेला कशाला घाबरेन. पण माझी एक अट आहे, असे सांगत त्याने स्वतःची अट सगळ्या लोकांसमोर सांगितली. अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात जेवढा वेळ दिला आहे. त्याच्या निम्मा मला देऊ द्या आणि नंतर आपने चर्चेसाठी वेळ आणि जागा निश्चित करावी, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

गौतम गंभीरला निवडणूक आयोगाकडून नोटीस

मतदारसंघात केलेल्या भाषणामध्ये गौतम गंभीर याने अरविंद केजरीवाल हे केवळ चर्चा, धरणे आंदोलन आणि नाटकबाजी करण्यातच चांगले आहेत, अशी टीकाही केली. माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचे आव्हान त्यांनी खूप वेळा दिले आहे. कधी कधी ते म्हणतात माझ्याकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत. आता तर अरविंद केजरीवाल म्हणताहेत की मी वर्षातील २४० दिवस परदेशात वास्तव्याला असतो. 

पूर्व दिल्लीतील निवडणूक यंदा देशभरात चर्चेत आहे. कारण या मतदारसंघातून भाजपने गौतम गंभीर याला उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात आपने आतिशी यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने अरविंदर सिंह लवली यांना रिंगणात उतरविले आहे. यापैकी केवळ अरविंदर सिंह लवली यांनाच राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. बाकी दोघेही राजकारणात नवे आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Gautam Gambhir dares Arvind Kejriwal to debate But he has a condition