पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

शकील अहमद

माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. शकील अहमद यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पक्षाविरोधात बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आमदार भावना झा यांनाही काँग्रेसने निलंबित केले आहे.

राहुल गांधींना पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे- सॅम पित्रोदा

शकील अहमद हे बिहारच्या मधुबनी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर भावना झा या बिहारमधील बेनीपट्टी येथील काँग्रेसच्या आमदार आहेत. निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काँग्रेसने त्यांना निलंबित केले आहे. 

शकील अहमद हे मधुबनी मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेले आहेत. त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष म्हणून. पण काँग्रेसने नकार दिल्याने अहमद यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, मोदींची नाही- राहुल गांधी