पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये मोदींच्या नावाची घोषणा, FIR दाखल

दिग्विजय सिंह

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय सिंह यांचा रोड शो भोपाळमध्ये झाला होता. 

'प्रज्ञासिंह यांच्या प्रचारानंतर शिवराजसिंह यांना आंघोळ करावी लागत नाही ना?'

यापूर्वी दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी साधू-संतांनी भोपाळमध्ये कॉम्प्युटर बाबा यांच्या नेतृत्वाखाली भगवा ध्वज घेऊन मिरवणूक काढली होती. या रोड शोमध्ये मोठ्याप्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली होती. यावेळी काही पोलिस साध्या वेशात होते. साध्या वेशातील पोलिसांनी भगवा दुपट्टा परिधान केल्याचे छायाचित्रे समोर आली होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, साध्या वेशातील एका महिला पोलिस कर्मचारीने आमच्याकडून असे करुन घेण्यात आल्याचे सांगितले होते. 

मी कन्हैय्याकुमारचा समर्थक, आरजेडीने मोठी चूक केली-दिग्विजय सिंह

दरम्यान, दिग्विजय सिंह यांच्यावर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली होती. 'दिग्विजय सिंह यांचे नाव माझ्या तोंडातून निघाले नाही पाहिजे, नाहीतर मला आंघोळ करावी लागेल', असे वक्तव्य शिवराजसिंह चौहान यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार दिग्विजय सिंह यांनी घेतला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (भोपाळच्या भाजप उमेदवार) यांचा प्रचार केल्यानंतर शिवराजसिंह यांना आंघोळ तर करावी लागत नाही ना, असा तिरकस सवाल त्यांनी विचारला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 FIR registered after a group of people raised Modi slogans in Digvijaya Singh s roadshow