पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM: भाजपच्या माजी नेत्याचे सुप्रीम कोर्टबाबत वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस नेते उदित राज

एक्झिट पोलमध्ये मागे पडल्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी आशादायी असलेले विरोधी पक्ष आता इव्हीएमवर प्रश्न उपस्थितीत करत आहेत. आता या वादात काँग्रेस नेते उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयाला ओढले आहे. नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये सहभागी झालेले उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत वादग्रस्त टि्वट केले आहे. 'सर्व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही. का तेही या घोटाळ्यात सहभागी आहेत. निवडणूक प्रक्रियेमुळे सर्व सरकारी कामे सुमारे तीन महिन्यांपासून मंदावली आहेत. मग अशावेळी मतमोजणीला २ ते ३ दिवस लागले तर काय फरक पडणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.

उदित राज यांनी या टि्वटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही टॅग केले आहे. उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयाबरोबर निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. निवडणूक आयोग विकले गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगावर टि्वट करताना म्हटले की, 'भाजपला जिथे जिथे इव्हीएम बदलायचे होते. तिथे त्यांनी ती बदललीही असतील. त्यामुळेच तर ७ टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. तुमचे कोणीच ऐकणार नाही, तुम्ही ओरडत राहा. लिहिण्यामुळे काहीच होणार नाही. जर देशाला इंग्रजांच्या गुलामापासून वाचवायचे असेल तर आंदोलन करावे लागेल. साहेब निवडणूक आयोग विकला गेला आहे.'

त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात आल्यास पुढील हालचालींसाठी UPA सज्ज

दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची १०० टक्के मोजणी करण्यात यावी, अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती.

एक्झिट पोल जाहीर होत असताना शरद पवार यांची 'फोन पे चर्चा'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 ex bjp leader udit raj tweets against supreme court on evm and vvpat issue