पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हीव्हीपॅटबाबतची विरोधकांची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली

निवडणूक आयोग

इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्वच चिठ्ठ्यांची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मंगळवारी अशा आशयाची याचिका फेटाळली होती. २२ विरोधी पक्षांनी मिळून मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेत मतमोजणी संदर्भातील आपल्या मागण्या निवडणूक आयोगासमोर मांडल्या होत्या. निवडणूक आयोगाचा हा निर्णय विरोधकांना मोठा धक्का मानला जातो.

विरोधकांना EVM ची चिंता, २२ पक्षांनी EC ला दिल्या दोन आयडिया 

विरोधकांनी मंगळवारी आयोगाला दिलेल्या भेटीत दोन सूचना केल्या होत्या. मतमोजणीपूर्वी या सूचनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.  निवडणूक आयोगाने जवळपास एक तास विरोधकांचे शंका ऐकून घेतल्या होत्या. एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिला होता की, मतदार क्षेत्रातील पाच केंद्राची निवड करुन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रा आणि व्हीव्हीपॅटमधील यांच्यातील मते जुळतात का हे तपासून पाहावे.

मतमोजणीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे ट्रॅकिंग करावे आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची अधिकाधिक मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. जर एखाद्या मतदारसंघातील एकाही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते जुळली नाहीत. तर त्या मतदारसंघातील सर्वच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जावी. त्यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी मदत होईल, असे विरोधकांनी म्हटले होते.

EVM सोबत VVPAT मतमोजणीची याचिका कोर्टाने फेटाळली

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Election Commission rejects demands of opposition parties regarding VVPAT