पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींना दुर्योधन नव्हे जल्लाद म्हणा, राबडी देवींची मुक्ताफळं

राबडी देवी

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यानंतर आता या वादात आरजेडी सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही उडी घेतली आहे. प्रियंका गांधी यांनी मोदींना दुर्योधन म्हणून चूक केली आहे. त्यांनी मोदींना जल्लाद म्हणायला हवे होते, असे त्यांनी म्हटले आहे. 

मोदी दुर्योधनाप्रमाणे अहंकारी, प्रियांका गांधींचा हल्लाबोल

राबडी देवी पुढे म्हणाल्या की, प्रियांका यांनी त्यांना दुर्योधन म्हणून चूक केली आहे. त्यांनी दुसरी भाषा बोलायला हवी. ते सर्वजण जल्लाद आहेत, जल्लाद. जे न्यायाधीश आणि पत्रकारांना मारतात, पळवून नेतात. अशा माणसाचे मन आणि विचार हे भयानकच असतील. 

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी हे भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर होते, अशी टीका मोदींनी केल्यानंतर प्रियांका गांधींनी त्यांची तुलना दुर्योधनशी केली होती. 

प्रियांका गांधींकडून उत्तर प्रदेशात पत्रास्त्र, अनेकांना पाठविली वैयक्तिक पत्रे

'देशाने अहंकाराला कधी माफ केलेले नाही. असा अहंकार दुर्योधनालाही होता. जेव्हा श्रीकृष्ण त्यांना समजवण्यास गेले तेव्हा दुर्योधनाने त्यांनाही बंदी बनवण्याचा प्रयत्न केला.' कवी दिनकर यांच्या कवितेतील काही ओळी त्यांनी यावेळी म्हटल्या. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। भगवान कुपित होकर बोले, डगमग डगमग दिग्गज डोले, असे प्रियांका यांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 do not say duryodhana to narendra modi he is jaillad says rjd leader rabri devi