पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेठीच्या मतदारांना राहुल गांधींचे पत्र

राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खुले पत्र लिहून अमेठी आपले कुटुंब असल्याचे सांगत भाजपवरही निशाणा साधला आहे. अमेठीबरोबरील माझे संबंध भावनात्मकरित्या तितकेच मजबूत आहेत जितके एखाद्या कुटुंबातील सदस्यांदरम्यान असते, असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी भाजप खोटेपणा आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकू इच्छिते असा आरोप केला. 

राहुल गांधी म्हणाले, अमेठी माझे कुटुंब आहे. माझा अमेठीतील परिवार मला सत्याच्या बाजूने उभे राहण्याची हिंमत देतो. मी गरीब-कमजोर लोकांचा त्रास ऐकू शकू, त्यांच्या वतीने आवाज उठवू शकू आणि सर्वांसाठी एकसमान न्यायाचा संकल्प घेऊ शकेन. तुम्ही मला प्रेमाची शिकवण दिली होती. त्याच्या आधारावर मी संपूर्ण देशाला उत्तर ते दक्षिण पू्र्व ते पश्चिम जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस पक्ष एकीकडे गरीब, महिला, छोटे दुकानदारांसाठी काम करु इच्छिते. तर दुसरीकडे भाजपचा उद्देश १५ ते २० उद्योगपतींना सरकारचे मालक बनवण्याचा आहे. काँग्रेसच्या दृष्टीने जनता मालक आहे. तर भाजपच्या यंत्रणेत अनिल अंबानी हे मालक आहेत. काँग्रेसचे सरकार येताच अमेठीचा रखडलेल्या विकासाला गती येईल. पुन्हा विकासाच्या प्रक्रियेला वेग येईल, असे ते म्हणाले.

माझ्या अमेठीतील जनतेला माहीत आहे की भाजपचे लोक निवडणुकीवेळी येथे खोटेपणाचा कारखाना सुरु करतात आणि पैशांचा पूर आणतात. पण भाजपवाल्यांना हे माहीत नाही की, अमेठीची ताकद ही त्यांचा खरेपणा, स्वाभिमान आणि साधेपणा आहे, असेही त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 congress president rahul gandhi writes letter to amethi public before voting