पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी कधीच मोदींच्या कुटुंबीयांचा अपमान करणार नाहीः राहुल गांधी

राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या कुटुंबीयाबाबत वारंवार वाईट बोलतात. पण मी त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणार नाही, असे विधान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील एका प्रचारसभेत केले. यावेळी त्यांनी मोदींनी बालाकोट एअर स्ट्राइकवेळी रडारबाबत केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली. भारतात जेव्हा पाऊस किंवा वादळ येते तेव्हा सगळी विमाने रडारवरुन गायब होत असतील, असेही त्यांनी विचारले.

मोदींना वाटते ढगाळ हवामानामुळे ते लोकांच्या रडारवर येणार नाहीत, प्रियांकांचा टोला

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. काँग्रेस सरकारने कर्ज माफ केलेल्या चौहान यांच्या नातेवाईकांची नावे घेतली. भाजप सरकारच्या काळात मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा उल्लेख करत मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. 

सॅम पित्रोदा बोलले ते चुकीचेच, देशाची माफी मागायला हवी - राहुल गांधी

दरम्यान, प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. गेल्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात लोकांना जुमल्यांशिवाय दुसरे काहीही दिले नाही. त्यांना असे वाटते की ढगाळ हवामानामुळे ते कधीही लोकांच्या रडारवर येणार नाहीत. हिंदीतून केलेल्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी प्रियांका गांधी यांना जोरदार प्रतिसाद दिला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Congress President Rahul Gandhi nimach rally slams on pm narendra modi